Posts

Showing posts from April, 2021

आयुष्याची रंगीत तालीम

                  कसे असते ना आयुष्य ? अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे! सतत पुढे जात राहणारे. कितीही काही झाले तरी चालत राहणारे . थकलो , हरलो , रडलो तरी आयुष्य पुढे जातच राहते . समोरच्या आव्हानांना तोंड देत जबाबदारी सांभाळत असताना भूतकाळातल्या कडूगोड आठवणी डोक्यात साठवत आणि भविष्याची काळजी करत जगताना आपण जगणेच हरवून जातो . येणाऱ्या अडचणींमुळे वास्तवाला घाबरतो आणि भावविश्वाला आपलेसे करतो . आयुष्याचा हा संघर्ष जन्माच्या आधीच सुरू होतो . या सगळ्या धावपळीत आयुष्याचा सुवर्णकाळ कोणता? असे कोणी मला विचारले तर माझे उत्तर आहे   “बालपण”!              ‘बालपण’ एक वेगळीच निरागसता , अबोल भावनांचा अद्भुत संगम , उत्कट उत्सुकतेचे शिखर , इवल्या इवल्या डोळ्यांनी दिसणारे हे सुंदर जग इवल्याशा मुठीत बंद करू पाहणारे स्वप्नाळू विश्व , दिलखेचक अदांचा लक्षवेधी काळ , ना भूतकाळाचा लेखाजोखा ना भविष्याची चिंता , फक्त वर्तमानात राहून प्रत्येक क्षण खास बनवणारा सुवर्णकाळ! जादुई परीने यावे आणि जादूच्या छडीने सगळे मोहरून टाकावे असे पर्...