Posts

Showing posts from May, 2021

भान वास्तवाचे

           मृत्यू …… एक शाश्वत सत्य! या इहलोकात जन्म घेतला म्हणजे मृत्यू अटळ . कदाचित म्हणूनच इहलोकाला मृत्यूलोक असेही म्हणतात . मृत्यू म्हणजे या मृत्यूलोकातल्या आपल्या अस्तित्वाचा अंत . एक दिवस या मृत्यूला सामोरे जायचे आहे हे माहित असते , तरीही याबद्दलचा विचारही मनाचा थरकाप उडवतो नाही का? कदाचित या कटू सत्याला स्वीकारण्याची मानसिकताच नसते . गीतेतल्या श्लोकाप्रमाणे ,                                   “ जातस्य हि ध्रुवो मृत्यूध्ररवं जन्म मृतस्य च। ।                                                                      तस्मादपरिहार्ये र्थे न त्वं शोचितुमर्हसी।।”            ...