Posts

Showing posts from July, 2021

खंत

              अथांग असा पसरलेला निळाशार समुद्र , पर्वतराजीत उगम पावून सागर मिलनाच्या प्रवासात प्रत्येकाचे जीवन समृद्ध करत निघालेल्या नद्या , अभेद्य असे पर्वत , तप्त धरणीला शांत करणारा पाऊस , सुर्यकिरणांमुळे तयार झालेले इंद्रधनुष्य , कानावर येणारा असंख्य पशु - पक्ष्यांचा आवाज , थंडीच्या दिवसात पसरलेली धुक्याची चादर , नेत्रतृप्त करणारे हे अविस्मरणीय दृश्ये असतात . हा अद्भुत नजराणा आपल्याला निसर्गाकडून प्राप्त झालेला आहे . ज्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे असा निसर्ग , ज्याच्यामुळे आपले अस्तित्व आहे तो निसर्ग , या इहलोकात स्वर्गसुखाची अनुभूती देणारा निसर्ग , प्रत्येक घटकाच्या उत्पत्तीच कारणीभूत ठरणारी एक साधन ,   या विश्वातल्या प्रत्येक घटनेच मूळ .     निसर्ग ..…   एक अशी संकल्पना जी जितकी समजून घ्यावी तितकी उलगडत जाणारी .                   प्राचीन संस्कृतीने आपल्याला निसर्गनियम शिकवले . निसर्गाला अनुभवायला शिकवले . निसर्गाच...