Posts

Showing posts from September, 2021

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर- कळसूबाई

Image
            कळसुबाई …… पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर . जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या अतूट , अभेद्य अशा सह्याद्री पर्वताची शान . अर्थातच महाराष्ट्राचे एव्हरेस्ट . पर्वतराजीत उगम पावणारे धबधबे   आणि तो स्वर्गाची अनुभूती देणारा निसर्गसौंदर्याचा अद्भुत नजराणा .. पराकोटीचे नयनसुख . अशा ठिकाणी पावसाळ्यात भेट देणे म्हणजे पर्वणीच नव्हे का?                       समुद्रसपाटीपासून 1 ,646 मीटर उंचीवर असलेले हे शिखर अहमदनगरमधील अकोला आणि नाशिकमधील इगतपुरी यांच्या सीमेवर वसलेले आहे . या भागात   प्रामुख्याने बेसॉल्ट खडक आणि जांभी मृदा आढळून येते .                        पायथ्याशी असणाऱ्या बारी गावातून शिखराकडे वाटचाल करावी लागते . या गावच्या ग्रामपंचायतीने वाहनांसाठी पार्किंगची सोय केलेली आहे . गावातून थोडेसे चालत गेल्यानंतर...