अनुभवावे असे काही.....
सूर्योदय …. एक विलक्षण अनुभव . रात्रीच्या किर्रर्र अंधारानंतर प्रकाशाचा आश्वासन देणारी एक नैसर्गिक घटना . सूर्यास्त झाला म्हणजे सगळे संपत नाही , तर डोक्यात आलेल्या विचारांच्या वादळाला शमवण्यासाठी असलेल्या रात्रीनंतर नव्या उमेदीने जगायला शिकवणारे निसर्गाचे एक अद्भुत रूप म्हणजे सूर्योदय . खरंच निसर्ग एक गूढ आहे , समजून घेत जावे तसे उलगडत जाते , पण त्याला थांग नाही . निसर्ग प्रत्येक गोष्ट किती चपखलपणे स्वतःमध्ये सामावून घेतो . निसर्ग जगायला शिकवतो . जन्मही त्याच्याच कुशीत आणि जगण्याची उमेद देणाराही तोच . मृत्यूनंतर विलीन करून घेणाराही तोच . सूर्योदयही त्याचीच एक देणगी . भौगोलिकदृष्ट्या बघायला गेलं तर सूर्यमालेतील ग्रहांच्या परिवलन आणि परिभ्रमण यांच्यामूळे घडून येणारी एक घटना , पण भावनिकदृष्...