प्रवास
प्रवास ...... व्याखिक भाषेत सांगायचे झाल्यास प्रवास म्हणजे स्थानांतरण . अर्थातच एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाणे म्हणजेच प्रवास . मग हा प्रवास कसाही आणि कुठलाही असो सतत चालूच असतो . या प्रवासाला कारणेही असू शकतात , जसे की कामानिमित्ताचा प्रवास , गावी जाण्यासाठीचा प्रवास , इति . प्रवास करणे एखाद्याचा छंदही असतो . असा हा प्रवास प्रवासमार्गात क्षणागणिक नवीन गोष्टी उलगडत जातो . आपले आयुष्यही पण एक प्रवासच नाही का! जो प्रवास जन्माआधी सुरू होतो आणि गंतव्याच ठिकाण म्हणजे मृत्यू . जन्मापासून मृत्युपर्यंतची वाटचाल म्हणजे प्रवासमार्ग . म्हणूनच कदाचित माणसाला प्रवासी अशी उपमा दिली असावी . प्रवासाच्या सुरुवातीलाच गणपती बाप्पाचं नाव घेत प्रवास सुखकर व्हावा अशी आशा व्यक्त केली जाते . हेतू इतकाच की प्रवासात मनाला शांतता लाभावी . मानवी सकारात्मकतेचे स्पष्ट चित्रण असते हे . रस्त्याच्या दुत...