प्रारंभ
सूर्यास्त … दिवसभराच्या धांदलीतून शांततेची अनुभूती देणारा एक विलक्षण अनुभव . मनातल्या वादळाला किनारा दाखवणारा आणि मनातल्या आशा - आकांक्षांना नव्याने बहरण्यासाठी एक हलकीशी रात्र नावाची विश्रांती देणारा असा हा सूर्यास्त . पण आज जरा वेगळाच भासला . कारण हा २०२२ या वर्षाला अस्ताकडे नेत होता , जेणेकरून २०२३ आपले किरण या जगतावर पसरवण्यासाठी जणूकाही त्याच्या कालरथावर आरूढ होईल . प्रत्येक दिवस जसा एक नवा अनुभव देत आपल्याला जगायला शिकवतो , तसेच सरते वर्ष आपल्याला घटित घटनांचा आढावा घेत पुढे जायला शिकवते . आयुष्याच्या निरनिराळ्या स्तरांमध्ये निरनिराळी पण अनुरूप अशी शिकवण प्रत्येक सरते वर्ष आपल्या पदरात टाकून अनुभवांचा बांध घालत असते . परंतु आपल्या झोळीची क्षमता आणि योग्यताच आपल्याला त्या शिकवणीतून शिकायला भाग पाडते . घडलेल्या वाईट गोष्टी जगणे सावरायला शिकवतात . आणि चांगल्या गोष्टी जगण्याची एक नवीन उभारी देतात . मनाला प्रोत्साहित कर...