हा सागरी किनारा……..
एका शांत सायंकाळी सहजच किनाऱ्यावर फेरफटका मारावा . थंडावत चाललेल्या वाळूचा तो अलगद असा स्पर्श आणि अंगावर शहारे आणणारा तो शांत वारा अनुभवत घरट्याकडे परतणारा तो पक्ष्यांचा थवा नजरेस पडावा . किनाऱ्यालगतच्या झाडाच्या शहाळ्याचा आस्वाद घेत मावळतीच्या सूर्याकडे बघत किनाऱ्यावर धडकणाऱ्या त्या लाटांचा आवाज . अहाहा! ... याहून विलोभनीय दृश्य काय असावे ! अथांग असा क्षितिजावर पसरलेला हा समुद्र दुरून जरी शांत वाटत असला तरी किनाऱ्यावर थडकणाऱ्या बेभान उसळलेल्या लाटा त्या आतल्या अशांततेचे प्रतीक असतात . असे म्हणतात की , “ उथळ पाण्याला खळखळाट फार” पण हे समुद्राच्या उथळ लाटांना लागू होत नाही बरे . कारण किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांना सागरातल्या संघर्षाची चाहूल असतेच . त्याचा सुगावा कोणाला लागायला नको म्हणूनच कदाचित तो उथळपणा असावा . निश्चल असा वाटणारा तो महाकाय समुद्र कितीतरी गुपिते स्वतःमध्ये सामावून घेतो . कारण फक्त त्यालाच माहिती अ...