ती….
" यत्र नार्यस्तु पुज्यते रमन्ते तत्र देवता " जिथे तिचा सहवास आहे तिथेच देवाचा वास. कोण आहे ती? तर ती आहे अनदिकालाची उत्पत्ती अन अनंतकालाची सृजनशीलता, आदिशक्ती ! आज 8 मार्च जागतिक महिला दिन. जिने भगवंताच्या स्थानी जन्म घेतला. तिच्यासाठी असणारा हा खास दिवस. जिच्यामुळेच आपला प्रत्येक श्वास आहे. तिच्यासाठी खास एक दिवस असणे ही खरेतर आपल्यासाठी शोकांतिका आहे. तिला तिचा सन्मान बहाल करायला एका खास दिवसाची का गरज पडावी. नवरात्रीचे नऊ दिवस तिला मखरात बसवणे आणि या एकाच दिवशी तिचा सन्मान व्हावा का ? जो तिला रोज मिळायला हवा. ती सर्वगुणसंपन्न आहे. अष्टपैलू आहे. तिला तिचे स्थान द्यायला दिवस नेमायची गरज का भासावी. याचा सारासार विचार नक्कीच करायला हवा. ती स्वतः उत्पत्ती आहे, जन्मदात्री आहे, सहचारिणी आहे आणि तरीही तिच्या अढळ स्थानाला धक्का म्हणजे आपण माणूस म्हणू...