एक मागोवा….कोरोनाचा...
फेसबुकचे पोस्ट, ट्विटरचे ट्रेंडिंग
आणि अगदी काही वेळातच सर्व जगाला कवेत घेत लहानसहानग्यांच्या ओठांवर सहज येऊन ठेपलेला
एक शब्द कोरोना अर्थातच कोविड-19. एक अतिसूक्ष्म विषाणू
ज्याने संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवले असा महाविक्राळ रूप पसरणारा कोरोना हाच
तो.
सन 2020 च्या सकाळीच दाराच्या उंबरठ्यावर उभा ठाकलेला
हा कोरोना अजूनही आपले बस्तान हलवायला तयार नाही. एका एवढ्याशा विषाणूने सगळ्यांना हादरवून सोडलं. आयुष्यच बदलवून टाकलं. असं केलं काय? तर संपूर्ण जगाला चक्रव्यूहात घेरलं
आणि बुद्धीचा माज चढलेल्या मानवजातीला आपलं सगळं बौद्धिक बळ पणाला लावायला लावलं.
या महामारीच्या काळात खूप
लोकांचे आयुष्य उद्धवस्त झाले, कित्येकांचे प्राण
गेले. आत्तापर्यंतचा सर्वात
कठीण काळ होता हा. आठवणीही नकोशा वाटतात, पण एका दृष्टीने आपल्याला खूप काही शिकवलं कोरोनाने.
स्वतःच्या हव्यासापोटी सुख
समृद्धीकडे धावत चाललेल्या आणि निसर्गाला पायदळी तुडवत भरभराट पाहणाऱ्या मानवाला त्याने
‘निसर्गनियमन’ काय असतं ते दाखवलं. निसर्ग स्वसंरक्षणासाठी
कुठलेही पाऊल उचलू शकतो याचच ते अप्रत्यक्ष उदाहरण. तरीही स्वतःवरच अतिक्रमण सावरताना त्यानं मानवजातीला
सुरक्षिततेचा रस्ता दाखवला हीच त्याची महानता.
धकाधकीच्या जीवनात धावपळीच्या युगात आयुष्याच्या पदपथावर थोडा
विसावा घ्यायला कोरोनाने शिकवले. पोटासाठी सतत धावपळ
करणाऱ्यांना काही वेळ थांबून कुटुंबात रमायला शिकवले. हरवत चाललेल्या कुटुंबपद्धतीच्या संस्कृतीला जपण्याचा
एक छोटासा प्रयत्न. आयुष्य जगणं हे काय
असते हे शिकवण्याचा प्रयत्न केला. नातीगोती, आजूबाजूची माणसे, समाज याची नवीन ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. आभासी जगाकडे पळणाऱ्या माणसाला वास्तविकतेची जाणीव
करून देत खऱ्या अर्थाने जगायला शिकवले.
खूप जणांची तक्रार
असेल की कोंडून घ्यावा लागले स्वतःला , काय हा कोरोना? घरात
बसवून ठेवले, मान्य आहे. माझ्या चंचल बुद्धीला
पण नाही पटत हे, पण एक सकारात्मक बाजू
आहेच की, ती म्हणजे कोरोनाची
शिकवण. सोबत राहून मित्रव्यक्तीच्या
पाठीत खंजीर खुपसणाऱ्या माणसाला कोरोनाने अंतर ठेवून एकमेकांची काळजी घ्यायला लावली. झगमगाटाच्या हव्यासापोटी
आनंदाच्या काही क्षणांना पायदळी तुडवणाऱ्याला क्षणिक सुख अनुभवायला शिकवले. माणुसकी विसरत चाललेल्या माणसाला माणुसकीची आठवण
करून देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडिया, इंटरनेट यात हरवत चाललेल्या माणसाला त्यातून बाहेर
काढण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.
उधळपट्टी करणाऱ्याला
साठवणुकीची शिकवण दिली तर नुसती साठवणूक करणाऱ्याला त्याच्या वापराची योग्य वेळ सुचवली. स्वार्थ बघणाऱ्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. पैसा, नाव याच्या जोरावर गर्वाने फुगलेल्या सगळ्यांना
समपातळीची आठवण करून दिली. कोणीही लहान मोठं
नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. छोट्या छोट्या क्षणात आनंद शोधायला शिकवले.
खूप नुकसानही केले. हातावर पोट असणाऱ्यांना उपाशीही राहावं लागले. जगण्याचा एक सर्वात मोठा संघर्ष करावा लागला. पण तरीही कितीही मोठं वादळ आले तरी तग धरण्याची
क्षमता ठेवत तितक्याच क्षमतेने प्रतिकार करायला शिकवले. विकृतीकडे झुकत चाललेल्याना
संस्कृती आठवून द्यायचा प्रयत्न केला. एकमेकांचा आदर करायला शिकवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गाने त्याचे देवत्त्व
सिद्ध केले. त्याच्यामुळे आपण
आहोत याची जाणीव करून दिली.
खूप महत्वाचे बदल
घडले. त्याकडे आपल्या बघण्याचा
दृष्टिकोन आपण ठरवणे गरजेचे आहे. अजूनही कोरोनाचे संकट गेलेले नाही. काळजी घेणे आपल्या हातात आहे. घेऊयात मग..
Khup chhan lihilay.
ReplyDeleteKeep it up!
Interesting stuff to read. Keep it up.👍
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletekhoopach chaan👏
Deletegreat 👌👍
Nice❤
ReplyDeleteखूप छान लेख लिहला आहे. समग्र मानवी जीवनाचे सुश्म निरीक्षण करून मत व्यक्त केलेस खूप छान...
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice🔥
ReplyDeleteखूप छान..💐
ReplyDeleteKeep it up🙂
👍👍
ReplyDelete💯💯💯
ReplyDeleteApratim 🔥💯
ReplyDeleteVery nice vrush
ReplyDelete