Posts

ती….

 " यत्र नार्यस्तु पुज्यते रमन्ते तत्र देवता "                        जिथे तिचा सहवास आहे तिथेच देवाचा वास. कोण आहे ती? तर ती आहे अनदिकालाची उत्पत्ती अन अनंतकालाची सृजनशीलता, आदिशक्ती !                      आज 8 मार्च जागतिक महिला दिन. जिने भगवंताच्या स्थानी जन्म घेतला. तिच्यासाठी असणारा  हा खास दिवस. जिच्यामुळेच आपला प्रत्येक श्वास आहे. तिच्यासाठी खास एक दिवस असणे ही खरेतर आपल्यासाठी शोकांतिका आहे. तिला तिचा सन्मान बहाल करायला एका खास दिवसाची का गरज पडावी. नवरात्रीचे नऊ दिवस तिला मखरात बसवणे आणि या एकाच दिवशी तिचा सन्मान व्हावा का ? जो तिला रोज मिळायला हवा.                      ती सर्वगुणसंपन्न आहे. अष्टपैलू आहे. तिला तिचे स्थान द्यायला दिवस नेमायची गरज का भासावी. याचा सारासार विचार नक्कीच करायला हवा. ती स्वतः उत्पत्ती आहे, जन्मदात्री आहे, सहचारिणी आहे आणि तरीही तिच्या अढळ स्थानाला धक्का म्हणजे आपण माणूस म्हणू...

सफरनामा भाग - १

  “ झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया ”                   ग . दि . माडगूळकरांच्या लेखणीतून अवतरलेले हे बालगीत आपल्या सुवर्णकाळाचा एक अविभाज्य भाग होते . सुट्ट्यांमध्ये हे गाणे बडबडत मामाच्या गावाला जाण्यात एक वेगळेच सुख होते नाही का! भलेही प्रवास कसाही असो . हे रेल्वेने जाण्याचे स्वप्न मात्र मोठेपणी साकार झाले असले तरीही चेहऱ्यावरून ओसंडणारा आनंद मात्र तोच होता बरे! तर ही आहे माझ्या पहिल्या वाहिल्या रेल्वेप्रवासाची कथा .   साहित्यिक भाषेत प्रवासवर्णन हो .               तर ह्या प्रवासाचे नियोजन झाले फक्त दोन दिवस आधी . अर्थातच एकच आरक्षणाचा पर्याय शिल्लक होता तो म्हणजे तात्काळ आरक्षण . बरोबर अकरा वाजण्यास अवघे काही मिनिटे बाकी असताना हातातल्या दुरभाष यंत्राला नमस्कार करून त्यावरील आभासी खिडकीवर जाऊन अकरा वाजण्याची वाट बघत होतो . एवढ्या रामकथेला फळ मिळाले तिकीट आरक्षित झाल्याचा मिळालेला संदेश पाहून . प्रवासाचा दिवस उजाडताच उरले सुरले स...

हा सागरी किनारा……..

Image
                 एका शांत सायंकाळी सहजच किनाऱ्यावर फेरफटका मारावा . थंडावत चाललेल्या वाळूचा तो अलगद असा स्पर्श आणि अंगावर शहारे आणणारा तो शांत वारा अनुभवत घरट्याकडे परतणारा तो पक्ष्यांचा थवा नजरेस पडावा . किनाऱ्यालगतच्या झाडाच्या शहाळ्याचा आस्वाद घेत मावळतीच्या सूर्याकडे बघत किनाऱ्यावर धडकणाऱ्या त्या लाटांचा आवाज . अहाहा! ... याहून विलोभनीय दृश्य काय असावे !                 अथांग असा क्षितिजावर पसरलेला हा समुद्र दुरून जरी शांत वाटत असला तरी किनाऱ्यावर थडकणाऱ्या बेभान उसळलेल्या लाटा त्या आतल्या अशांततेचे प्रतीक असतात . असे म्हणतात की , “ उथळ पाण्याला खळखळाट फार” पण हे समुद्राच्या उथळ लाटांना लागू होत नाही बरे . कारण किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांना सागरातल्या संघर्षाची चाहूल असतेच . त्याचा सुगावा कोणाला लागायला नको म्हणूनच कदाचित तो उथळपणा असावा .                 निश्चल असा वाटणारा तो महाकाय समुद्र कितीतरी गुपिते स्वतःमध्ये सामावून घेतो . कारण फक्त त्यालाच माहिती अ...

राहिल्या फक्त आठवणी……..

    " शायद फिर वह तकदिर मिल जाए   जीवन के हसीन पल मिल जाए चल फिर बैठे क्लास की उस लास्ट बेंच पे .. शायद वह पुराने दोस्त मिल जाए वह साथ बिताए हुए पल दांस्ता मे बदल रहे   आ गया वह मोड जिसमे अलविदा कहना पड रहा "               कोण्या अज्ञात लेखणीतून अवतरलेल्या या काही ओळी सहज समोर आल्या आणि चार वर्षांचा प्रवास डोळ्यांसमोर अगदी चित्रपटाप्रमाणे येऊन गेला . चार वर्षांपूर्वी ज्या परिसरात मनात भीती असताना दबक्या पावलांनी प्रवेश केला , तो परिसर सोडण्याची वेळ कधी आली ते समजलेच नाही .                    आज जेव्हा ते सुरुवातीचे दिवस आठवले ना तरी अलगद हसू फुटते . कावरे बावरे झालेले मन. भिरभिरत्या डोळ्यांनी आजूबाजूचा आजमावलेला तो परिसर, आजही तसाच डोळ्यांसमोर उभा राहतो . कॉलेजचा पहिला दिवस , झालेल्या नवीन ओळखी , सगळी नवी नवलाई हरखणारी होती . घराबाहेर पडताना उराशी बाळगलेली स्वप्ने कुठेतरी साकार होऊ पाहत होती . नव्या...

ऋतुराजाची मुहूर्तमेढ

Image
  " रसरंगांची करीत उधळण मधूगंधाची करीत शिंपण चैतन्याच्या गुंफीत माला रसिकराज पातला आला वसंतऋतु आला वसुंधरेला हसवायला , सजवीत , नटवीत लावण्याला आला वसंत ऋतू आला "                गीतकार शांताराम आठवले यांनी शब्दबद्ध केलेले , प्रभाकर जोग यांच्या संगीतासह आशा भोसले यांनी सुरबद्ध केलेले ‘आला वसंत ऋतू आला’ या गाण्याचे वरील बोल कानावर पडले अन मन मंत्रमुग्ध झाले . चैत्रारंभाची किंचितशी चाहूल मन मोहरून टाकते . फाल्गुन महिन्यात होळी आणि रंगपंचमी होऊन गेली असल्याने अगोदरच आपली मने उल्हासित झालेली असतात . चैत्रापासून ऊनही तेजाळून निघते . चैत्राचे ऊन म्हणजे फक्त झळा असे नाही , तर त्यात चैत्राची म्हणून एक सृजनशीलता असते . झाडांना पल्लवित करणारी आणि आणि फळांना गोडवा आणणारी . चैत्राची मायाही प्रथम मोहरून आलेल्या झाडावर अलगद उतरते आणि मग आपणाकडे येते . अशा या वसंताची मुहूर्तमेढ म्हणजे गुढीपाडवा . यालाच विजय पाडवा असेही म्हणतात .             ग्रेगरियन दिनदर्शिकेप...

प्रारंभ

                                 सूर्यास्त … दिवसभराच्या धांदलीतून शांततेची अनुभूती देणारा एक विलक्षण अनुभव .   मनातल्या वादळाला किनारा दाखवणारा आणि मनातल्या आशा - आकांक्षांना नव्याने बहरण्यासाठी एक हलकीशी रात्र नावाची विश्रांती देणारा असा हा सूर्यास्त . पण आज जरा वेगळाच भासला . कारण हा २०२२ या वर्षाला अस्ताकडे नेत होता , जेणेकरून २०२३ आपले किरण या जगतावर पसरवण्यासाठी जणूकाही त्याच्या कालरथावर आरूढ होईल . प्रत्येक दिवस जसा एक नवा अनुभव देत आपल्याला जगायला शिकवतो , तसेच सरते वर्ष आपल्याला घटित घटनांचा आढावा घेत पुढे जायला शिकवते .             आयुष्याच्या निरनिराळ्या स्तरांमध्ये निरनिराळी पण अनुरूप अशी शिकवण प्रत्येक सरते वर्ष आपल्या पदरात टाकून अनुभवांचा बांध घालत असते . परंतु आपल्या झोळीची क्षमता आणि योग्यताच आपल्याला त्या शिकवणीतून शिकायला भाग पाडते . घडलेल्या वाईट गोष्टी जगणे सावरायला शिकवतात . आणि चांगल्या गोष्टी जगण्याची एक नवीन उभारी देतात . मनाला प्रोत्साहित कर...